ओळखलंत का PM मला? क्युबिकल मध्ये आला कोणी,
डोळे होते झोपाळलेले, पापण्यांमध्ये दाटलेले पाणी...
समोर बसला, नंतर हसला, बोलला project matrix पाहून,
software काम करीत नाही, काही bugs आलेत आढळून!
बेकायदेशीर झोपडीप्रमाणे software मध्ये येऊन बसले,
आधी कधीच कळले नाहीत पण ऐन Go-live च्या वेळी दिसले...
आता सर मी राबतो आहे, अक्खा code तपासतो आहे,
tester चे डोके खातो आहे, analyst ला शिव्या देतो आहे!
test data संपला, tester देखील दमला, सगळा घोळ झाला,
खूप काळजी घेऊन घेऊनही हा भोग माझ्याच नशिबी का आला?
एक Certified Programmer असूनही मी आज असा हा फसलो...
आणि शेवटी नाईलाज झाला म्हणून तुमच्या समोर येऊन बसलो!
Keyboard कडे हात जाताच लगबगीनं उठला,
group mail नको सर, जरा location change हवासा वाटला...
कोलमडले जरी software तरी शाबूत आहे कणा,
एखादी on-site ची आस दाखवून पुन्हा code लिही म्हणा!
No comments:
Post a Comment